श्री. गुलाब मोहिते यांच्या कविता

*विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन*

भाकरीचे स्वप्न आम्हा दाखविलेस भीमा
परंपरा रुढींना तूच वाकविलेस भीमा

घोटभर पाण्यासाठी किती लाचार केले
चवदार तळे तेव्हा चाखवलेस भीमा

उकिरड्यावर पंगती अपमान आयुष्य
उघडे अंग सारे झाकविलेस भीमा

छाटलेल्या जीभा आणि शिवलेले ओठ
बोलायला तेव्हा तूच शिकवलेस भीमा 

किती पिढ्यांना गाढले पायात त्यांनी
उद्धारण्या, तूच त्यांना दुखविलेस भीमा

वर्गाच्या बाहेर बसलास तू आमच्यासाठी
तरीही आम्हाला शाळेत टिकविलेस भीमा

क्रांतीची ओळख तुझ्यामुळेच आम्हा
एकटा लढलास जरी सारे झुकविलेस भीमा

*गुलाब मोहिते कोकरुड ता शिराळा जिल्हा सांगली*





🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
जिंकता जिंकता कोरोनाची लढाई हारण्याकडे वाटचाल करीत आहे अशीच परिस्थिती सध्या देशात किंबहुना राज्यात निर्माण होत आहे.रूग्ण संख्या वाढत आहे. डाॅक्टर, पोलिस,सफाई कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत.मुंबई मध्ये दोन हाॅस्पीटल सध्या लाॅक केली आहेत. कर्मचारी डाॅक्टरांची तपासणी चालू आहे. झोपडपट्टीत रूग्ण सापडले आहेत. तिसरी स्टेज नजरेसमोर दिसत आहे. तरीही अद्याप काहीजण याबाबत गांभीर्याने विचार करत नाहीत.कारणाशिवाय बाहेर फिरत आहेत. दुर्दैवाने आपण कोणी बाहेर पडू शकत नाही. त्यांना समजावू शकत नाही. पण एक निश्चित करता येईल, आपण प्रत्येकाने फक्त आपल्या दहा नातेवाईकांना फोन फेसबुक ज्या  माध्यमातून तुम्हाला शक्य आहे ते वापरून घरी थांबायला सांगितले तर.....ही मोठी साखळी तयार होईल. प्रत्येकाने हे केले तर लोकांपर्यंत माहिती जाईल.सध्या शासन सांगत आहे पण लोक काळजी घेत नाहीत. नाहीतर अमेरिका इटली मध्ये जे चालले आहे ते देशात होण्यासाठी वेळ लागणार नाही.....

कुणासाठी कुणी रडावे तरी आता
कुणाला सांगावे धाडावे तरी आता

सगळ्याच तलवारी म्यान झालेल्या
कुणासाठी कुणी लढावे तरी आता

भयान काळोख चहुकडे दाटलेला
समस्त सूर्यांनी का दडावे तरी आता

तडफडताना पाहवेना आकांत सगळा
मृत्युला चकवून गाडावे तरी आता

पुरून घ्यावे मातीत नव्याने उगविण्यास
पानगळीत सारे झडावे तरी आता

उंबरठ्यावर मृत्यू टपून बसलेला
 कशाला बाहेर पडावे तरी आता

*गुलाब मोहिते कोकरुड ता. शिराळा जिल्हा. सांगली*





*फटका* (अनंत फंदी यांच्या रचनेवरून)

कशाला बाहेर जातोस गड्या
उगाच असा चिडू नको
कोरोनाचं संकट मोठं
घराबाहेर पडू नको ॥

किती दिसांनी सवड झाली
बायकापोरात बस जरा
गप्पा गोष्टी मायबापाशी
आईबापाशी हस जरा
झालं काय मग घरच्यांना
तेव्हा मातर रडू नको.....॥

सरकार किती सांगतंया
ऐकून घे की त्यांचं जरा
बेफिकीर तू राहू नको
सोडून दे रं तुझा तोरा
नको भाजी नको फळे
भानगडीत त्या पडू नको.....

हात धुयाचे वरचेवर
लक्षात ठेव जरा गड्या
दोन तासांनी गरम पाणी
चहा घे तू फाकड्या
सावध रहा तू आणि
अजून कोणा ओढू नको

कोरोनाचं संकट मोठं
बाहेर गड्या पडू नको.

 *गुलाब मोहिते कोकरुड*





*फटका* (अनंत फंदी यांच्या रचनेवरून)

कशाला बाहेर जातोस गड्या
उगाच असा चिडू नको
कोरोनाचं संकट मोठं
घराबाहेर पडू नको ॥

किती दिसांनी सवड झाली
बायकापोरात बस जरा
गप्पा गोष्टी मायबापाशी
आईबापाशी हस जरा
झालं काय मग घरच्यांना
तेव्हा मातर रडू नको.....॥

सरकार किती सांगतंया
ऐकून घे की त्यांचं जरा
बेफिकीर तू राहू नको
सोडून दे रं तुझा तोरा
नको भाजी नको फळे
भानगडीत त्या पडू नको.....

हात धुयाचे वरचेवर
लक्षात ठेव जरा गड्या
दोन तासांनी गरम पाणी
चहा घे तू फाकड्या
सावध रहा तू आणि
अजून कोणा ओढू नको

कोरोनाचं संकट मोठं
बाहेर गड्या पडू नको.

 *गुलाब मोहिते कोकरुड*




.      *भारत माँ के लिए*

भारत माँ के लिए आज हम आगे बढते है
छिड चुकी है जंग आओ मिलकरही लडते है ।

बोये है काटे राह पर आज हमारी किसी ने
चलो साथियो एक साथ उन्हे उखड़ते है।

माँ ने कुछ मांग की है अपने बेटी बेटों से
तुफान से टकराने एक साथ जुड़ते है।

पंख काटने की कोशिश की है ये किसी ने
दिखाएंगे जलवा मगर पंख बिना उड़ते है।

कोई भूखा प्यासा रहै ना आज देश मे
वक्तने की मांग तो अपना खून निचोड़ते है।

आंधी हो या तुफान हो सिने पे झेलेंगे हम
 फौलाद भी आए सामने तो मोम सा मरोडते है।

*गुलाब मोहिते कोकरुड ता शिराळा जिल्हा सांगली*





*क्यू घर से बाहर निकलते हो*

क्यू घर से बाहर निकलते हो
क्यू मौत को घर बुलाते हो।

घुम रही है मौत हर गली मोहल्ले
क्यू उसे तुम्हारी याद दिलाते हो।

घर में है माँ बाप भाई बच्चे बीवी
सोच अभी कैसे दिमाग चलाते हो।

ए वक्त नही हंसी मजाक का भाई
बार बार दे रहा याद फिर भी भुलाते हो।

देश की धड़कन सुन रे दोस्त
क्यू अरमान सभी के जलाते हो।

कितनी बार समझाए तुझे सरकार
क्यू सब का दिमाग हिलाते हो।

देख तेरे लिए कोई रस्ते पे खडा है
क्यू मेहनत किचड में नहलाते हो।

*गुलाब मोहिते कोकरुड ता शिराळा जिल्हा सांगली*





.      *बस वही करो*

उम्मीदों के दिए दिल में जलाओ
डरे हुए मन को धिरे से सहलाओ।

ए घडी भी दोस्तो गुजर जाएगी
फिर चमन मे बहार भी आएगी।

आज देश ने कुछ हमसे मांगा हैं
कोना कोना देश का देखो जागा है।

पथ्थर से घाव हमे आज झेलने है
हम एक है यही लब्ज बोलने है।

चाहे कितनी भी कोशीश हो मिटाने की
यही है घडी दुनिया में सर उंचा उठाने की।

ए जंग है तो लडेंगे और जितेंगे भी यारो
सरकार जितनी कहती है बस वही करो।

*गुलाब मोहिते कोकरुड ता शिराळा जिल्हा सांगली*




..  *ना मजहब याद है*

ना मजहब याद है ना जाती याद है,
सिर्फ इन्सान की आज आती याद है ।

कल तक लडते थे अपना और पराया
 किस वक्त की  दुनिया देती   याद है ।

दुश्मन को भी ना मिले सजा ए मौत की
ओ बिछडे सालों से साथी याद है ।

थम गई सी दुनिया आसमा गुंगा हुआ सा
लाखो दिलों से धड़कने जाती याद है।

कभी तो संभलकर चलेगी ए दुनिया
उम्मीद में हमारी जलती बाती याद है ।

*गुलाब मोहिते कोकरुड ता शिराळा जिल्हा सांगली*



*पोलीस डाॅक्टर सफाई कामगार जे जे आपल्यासाठी आज रस्त्यावर उतरून जीव धोक्यात घालून काम करत आहेत त्या सर्वांना*( मुलांच्या नजरेतून)

वाट बघतोय बाबा तुमची
घरी तुम्ही लवकर या
आमच्यासाठी लढताय पण
तुमचीसुध्दा काळजी घ्या. ...

आई मुलगा पत्नी बहिण
तुमच्याही घरी आहे
इवली इवली नाजूकशी
पाळण्यात परी आहे

विनंती करतो सगळ्यांना
मनापासून आदर द्या॥

टीव्हीवरच्या बातम्यांनी
उरात भरते धडकी
डोळे सदैव वाटेकडे
उघडीच असते खिडकी

जेवणाची टळली वेळ
पाणी तरी घोटभर प्या ॥

वाईट वाटले ऐकून तेव्हा
तुमच्यावर केला हल्ला
पटत नाही कुणाला
जीव वाचण्याचा सल्ला

माफ करा त्यांना तुम्ही
डिवचले हाताने ज्या ॥

एक मात्र नक्की बाबा
मनात माझ्या आदर्श असेल
जेव्हा जेव्हा संकट येईल
सर्वात पुढे मी दिसेल

गिरवीन कर्तव्याचा धडा
संस्कारांचा पाईक त्या ॥

*आमच्यासाठी लढताय पण*
*तुमचीसुध्दा काळजी घ्या*

*गुलाब मोहिते कोकरुड ता शिराळा जिल्हा सांगली*




.    *आई कुठे काय करते*

मूक सोसते वेदना
वेदनेचे गीत होई
त्याच गीतातून जन्मे
एक अतुल्य अंगाई
तळपत्या उन्हात
घार आभाळी फिरते ॥

आई कुठे काय करते.

तिच्या भुकेच्या घासाची
होई अनंत वाटणी
मऊ भात भरवते
तिच्या भाकरीवर चटणी
अर्ध पोटी उपाशीच
भूक रोजच चोरते  ॥

आई कुठे काय करते.

उधळते आयुष्य
उजवल्या कुसेसाठी
घर हीच आता पंढरी
अभंग अंगाईचा ओठी
काळजात खोल खोल
 सपान नवीन पेरते ॥

आई कुठे काय करते.

भेगाळल्या पायाला
चालवेना आता रस्ता
अंगावरच्या सुरकुत्या
मोजतात किती खस्ता
अडगळ झाली आज
पाणी डोळ्यात झरते ॥

आई कुठे काय करते.

*गुलाब मोहिते कोकरुड ता शिराळा जिल्हा सांगली*




No comments:

Post a Comment

 💥 *UDISE PLUS PART - 2* 💥 *Teacher database* 👆 *शिक्षकांची माहिती अपडेट कशी करावी* 👆 *नवीन शिक्षक एड करणे* 👆 *एखादा शिक्षक डिलीट करणे*...